घातपात, आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू?
खानापूर : खानापूर रेल्वे स्टेशन जवळील रेल्वेरुळाजवळ कालव्यात शनिवारी (ता.10) अनोळखी तरुणाचा संशयास्पद मृतदेह सापडला. त्याच्या शरीरावर कोणतेही घाव नसले तरी सदृढ असलेला तरूण गुडघाभर पाण्यात पडून कसा मरू शकतो त्यामुळे नागरिकातून दबक्या आवाजातून संशय व्यक्त होत आहे.
श्वास कोंडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अलीकडे खानापूर शहरासह ग्रामीण भागात निर्जन ठिकाणी अनोळखी मृतदेह आढळल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असून पोलिसांसमोरही तपासाचे मोठे आव्हान आहे.
मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. घातपात, आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू हे पुढील तपासात निष्पन्न होणार आहे. सदर घटनेची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta