खानापूर (प्रतिनिधी) : आंबोळी (ता. खानापूर) येथील मराठी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एन. कुंभार व शिवाजीनगर मराठी शाळेचे कन्नड शिक्षक बी. व्ही. गडाद यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल गावच्या वतीने तसेच एसडीएमसी व शिक्षकाच्या वतीने सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी कार्यक्रमाला शाळा सुधारणा समितीचे चेअरमन अर्जून नाईक, व्हाईस चेअरमन विष्णू चोर्लेकर, नारायण शास्त्री, माजी ग्राम पंचायत सदस्य शंकर शास्त्री, दत्तू कदम, दिपक शास्त्री, संजू पाटील, धाकलू नाईक, किरण नाईक, सीआरपी श्री. घाडी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात मुलांच्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. प्रास्ताविक व स्वागत श्री. सरासरी यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवराच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
तर यंदाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविलेले मुख्याध्यापक व्ही. एन. कदम व बी. व्ही. गडाद यांचा शाल श्रीफळ, पुष्पहार व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक व्ही. एन. कुंभार कृतज्ञता व्यक्त केली.
तर युवा कार्यकर्ते दत्तू कदम आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. आभार सरासरी यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta