खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सोमवारी दि. 19 रोजी येथील सरकारी दवाखान्यात मोफत बुस्टर डोस देण्यास प्रारंभ करण्यात आला.
यावेळी तालुक्यातील जनतेने याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बुस्टर डोसचा प्रारंभ भाजप नेते तालुका मेडिया प्रमुख व माजी शहर अध्यक्ष राजेंद्र रायका व भाजप नेते किरण यळ्ळुरकर यांना बुस्टर डोस देऊन करण्यात आला.
खानापूर तालुका भाजप पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेते राजेंद्र रायका, किरण यळ्ळुरकर, बाळू सावंत, गुंडू तोपिनकट्टी, सुनील मासेकर, रवी बडगेर, सुनील नाईक, युवा नेता पंडित ओगले, रामचंद्र देसाई, भरमाणी पाटील, आदी शेकडो खानापूर तालुका भाजप युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खानापूर सरकारी दवाखान्याचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे यांनी बुस्टर डोस देण्यास मोठे सहकार्य केले.
तसेच डॉक्टर व नर्स यांनी ही मदत केली.
बुस्टर डोस देण्यास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दाखवला होता.
Belgaum Varta Belgaum Varta