खानापूर (प्रतिनिधी) : दि. खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीची ९५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी दि. १५ रोजी मराठी मुलांची शाळा चिरमुरकर गल्ली येथे संपन्न झाली.
संस्थेचे विद्यमान अध्यक्ष बी. एम. पाटील अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष ओ.एन्. मादार यांनी स्वागत केले तर सचिव निवृत्ती पाटील यांनी अहवाल वाचन केले व सोसायटीच्या प्रगतीचा अहवाल मांडला. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी अहवाल काळात निवृत्त झालेले शिक्षक तसेच आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. संस्थेला यावर्षी १४.११ लाखाच्या नफा झाला. शिवाय संस्थेने कर्जमर्यादा याआधीच तीन लाखावरून पाच लाखापर्यत वाढवून, कर्जावरील व्याजदर हा ९.६% वरून ७% वर आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच इमारत निधीही ५०% कमी करून कर्जदाराना महागाईच्या या काळात दिलासा दिलेला आहे. तसेच सोसायटीच्या सुरेक्षेच्या दृष्टीने सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. यावेळी अशा निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले व समाधान व्यक्त केले. दरम्यान सोसायटीच्या नवीन बांधलेल्या इमारतीसंदर्भात प्रदीर्घपणे चर्चा करण्यात आली. सूत्रसंचालन गोविंद पाटील तर आभार जी. एन. पाटील यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta