खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजपच्या वतीने जांबोटी (ता. खानापूर) येथील मराठी शाळेच्या आवारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन वृक्षारोपण सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी बेळगांव जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, किरण यळ्ळुरकर, जनरल सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, माजी जि. प. सदस्य लक्ष्मण बामणे, लक्ष्मण झांजरे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष लक्ष्मण पाटील, रवी बडगेर, आदी उपस्थित होते.
प्रारंभी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुष्प गुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले.
यावेळी बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्याहस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बोलताना बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले की, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या ७२ व्यावाढदिवासाचे औचित्य साधुन सप्टेंबर १७ ते २ ऑक्टोबर पर्यंत खानापूर शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून जांबोटी भागातून येथील मराठी शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण सोहळा साजरा करण्यात येत आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी झाडाची जोपासना करून झाडे वाढवावी असे आवाहन केले.
यावेळी जांबोटी शाळेचा शिक्षकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta