खानापूर (प्रतिनिधी) : अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखणार्या खानापूर तालुक्यातील आंबेवाडी रस्त्याची नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे दुर्दशा झाली.
या रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे चर पडली आहे. तर रस्त्याच्या काही ठिकाणी मोठेमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची ये-जा करणे धोक्याचे झाले आहे.
तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकार्यांनी या रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करावे, अशी मागणी आंबेवाडी ग्रामस्थातून होत आहे.
——
नुकताच्य झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे नागरिकांना, विद्यार्थीवर्गाला या रस्त्यावरून ये-जा करणे तारेवरची कसरत होत आहे. याची दखल लोकप्रतिनिधी घ्यावी.
Belgaum Varta Belgaum Varta