खानापूर (तानाजी गोरल) : बेळगाव- पणजी राष्ट्रीय महामार्गात खानापूर तालुक्यातील कित्येक गावांमधील शेतकर्यांच्या जमिनी महामार्गात गेल्या आहेत. यापैकी लोंढा जिल्हा पंचायतीच्या व्याप्तीत येणार्या होनकल, शिंदोळी, नायकोल, सावरगाळी, माणिकवाडी, माडीगुंजी, लोंढा, अस्तोली, राजवळ या गावामधील शेतकर्यांना महामार्गांत गेलेल्या जमिनीचा सरकारकडून मिळणारा मोबदला अजून मिळाला नाही. ही बातमी समजताच खानापूर भारतीय जनता पार्टीचे नेते जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुकाध्यक्ष संजय कुबल, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली आज माडीगुंजी माऊली मंदिरच्या समुदाय भवनमध्ये या सर्व गावातील शेतकर्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये उपस्थित शेतकर्यांनी महामार्गाच्या अधिकार्यांकडून आमचे म्हणणे ऐकून घेतले नाहीत व त्यांच्याकडूनच आपल्याला किती त्रास झाला याचा पाढाच वाचून दाखविला. आपली स्वतःची जमीन किती गेली व किती पैसे मंजूर झालेले आहेत याची माहिती व ऑर्डर कॉपी कित्येक वेळा फेर्या मारूनही देण्यात आल्या नाहीत हे या बैठकीमध्ये निदर्शनाला आले. हे सर्व ऐकून घेतल्यानंतर श्री. प्रमोद कोचेरी यांनी बेळगावचे प्रांताधिकारी व एनएचआय धारवाडचे संचालक यांच्याशी दूरध्वनीवरून या भागाच्या जनतेच्या अडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. प्रमोद कोचेरी यांनी या लोंढा विभागात येणार्या सर्व गावच्या जनतेचे पैसे मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. व शेतकर्यांना त्यांच्या जमिनीच्या सर्व ऑर्डर कॉपी व माहिती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यांना त्यांच्या जमिनीचे ज्यादा पैसे मिळवून घेण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे आर. बी. टेशनसाठी दावे दाखल करावे लागणार आहेत याची पूर्ण माहिती या शेतकर्यांना देण्यात आली.
बैठकीला तालुका अध्यक्ष संजय कुबल, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई, परशुराम गोरल, अमोल बेळगावकर, मोहन पाटील, प्रकाश निलजकर व शेतकरी धानाप्पा पाटील, गुंजाप्पा घाडी, पुनाप्पा गावडा, मारुती गावडा, संजय देसाई, निलेश कुद्रे व लोंढा भागातील सर्व गावातील इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta