खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या पावसामुळे कक्केरी (ता. खानापूर) येथील शेतकरी इराप्पा नाडगौडा या गरीब शेतकऱ्यांचे घर कोसळून ९ महिने उलटून गेले. तरी तालुक्याच्या आमदारांनी तसेच शासकीय अधिकारी वर्गाने कोणतीच नुकसानभरपाई देण्याचे सहकार्य दाखवले नाही.
याची माहिती बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी कक्केरी गावाला भेट देऊन गरीब शेतकरी इराप्पा नाडगौडा याला धीर देऊन सरकार दरबारी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी गरीब शेतकऱ्याच्या कुटूंबाची परिस्थिती पाहून व उघड्यावर पडलेला संसार पाहुन लवकरात लवकर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना, तसेच ग्राम पंचायत पीडीओ, ग्राम पंचायत अध्यक्ष यांच्याच्याशी संपर्क साधुन सरकारी मदत मिळवुन देण्याचे आश्वासन दिले.
भाजप युवा नेते गजानन पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष दर्शन किल्लारी, साधू पाटील, भाजपचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta