खानापूर (प्रतिनिधी) : दिल्लीमध्ये आम आदमीकडून मोफत शिक्षण, मोफत प्रवास, मोफत इतर सवलती तसेच ८ ते १० हजार रुपयाची बचत कुटूंबासाठी केली जाते. तीच सवलत खानापूर तालुक्यात आम आदमी पक्षाचा आमदार होताच केली जाईल, असे आश्वासन खानापूर तालुका आम आदमीचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी खानापूर येथील शिवस्मारक चौकातील सभागृहात आम आदमी पार्टीच्या बैठकीत बोलताना सांगितले.
यावेळी ते म्हणाले की, खानापूर तालुक्यातील जनता जात, पात, धर्म, भाषा सोडून आम आदमी पार्टीला मदत करत आहे. म्हणून येत्या विधानसभा निवडणुकीत आम आदमीचाच आमदार होणार, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
यावेळी सचिव शिवाजी गुंजीकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले.
बैठकीला आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष भैर पाटील अध्यक्षस्थानी होते. तर सचिव शिवाजी गुंजीकर, दशरथ बनोशी, कबीर शेख, चंद्रकांत मेदार, रमेश कौंदलकर, मल्लिकार्जुन नेसरी, दत्तात्रय पुजार, मंजुनाथ बागेवाडी आदी उपस्थित होते. कार्यालयाचे सुत्रसंचालन व आभार शिवाजी गुंजीकर यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta