Tuesday , March 3 2026
Breaking News

यडोगा येथे भाजपचा महिला मेळावा संपन्न

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : यडोगा (ता. खानापूर) येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली महिला मेळावा संपन्न झाला.
यावेळी यडोगा गावचे ज्येष्ठ नागरिक व म. ए. समितीचे नेते रामा खांबले अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाची सुरूवात रामा खांबले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी बोलताना भाजप नेते विठ्ठल हलगेकर म्हणाले की, येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार कोणीही असुदे भाजपच्या उमेदवाराला निवडून द्या, असे म्हणत महिला मेळाव्यात आवाहन केले. यावेळी टी शर्टचे वाटप करण्यात आले. व हळदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी यडोगा गावातील नागरिक पंच मंडळी तसेच आकाश अथणीकर, भरमाणी पाटील, सदानंद पाटील, यल्लापा तिरवीर, चांगाप्पा निलजकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *