खानापूर (प्रतिनिधी) : मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या खानापूर येथील मराठा मंडळ सेकंडरी स्कूलच्या एकूण सात खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. त्या खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे : ओम अनिल कुंभार याने १०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. नमन सतिश पाटील याने ८० मीटर अडथळा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. प्रथमेश पुंडलिक देसाई याने बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. मंथन नागेश खांबले ६०० मीटर धावणे व्दितीय क्रमांक मिळवला.
विजयी स्पर्धकांना शाळेचे क्रीडा शिक्षक वाय. एफ. निलजकर, व एस. के. पाटील याचे मार्गदर्शन मिळाले. तर संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू व संचालक मंडळाचे प्रोत्साहन तसेच हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. एन. मेलगे व इतर शिक्षकांचे सहकार्य लाभले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta