खानापूर : आज शुक्रवार दि.30/9/22 रोजी कारलगा गावामध्ये हेब्बाळ ग्रामपंचायतीच्या वतीने ग्राम निर्मल योजनेअंतर्गत गावचा आराखडा (नकाशा) काढून त्याद्वारे समस्यांचा आढावा घेण्यात आला. मांडलेल्या समस्या पुढील प्रमाणे, पिण्याच्या पाण्याची समस्या सीसी गटर, सीसी रोड, विजेची समस्या, गावामध्ये सरकारी दवाखाना, गुरांचा दवाखाना, मलप्रभा नदीपासून गावापर्यंत पाण्याची व्यवस्था, तसेच गावच्या तळ्याचे सुशोभीकरण, समाज मंदिर, धोबीघाट, स्मशान, कारलगा हायस्कूलमधील विजेची समस्या, प्रायमरी शाळेसाठी डिजिटल बोर्ड आणि कम्प्युटर व अनेक शैक्षणिक समस्या ग्रामपंचायत अधिकारी व जनतेसमोर मांडण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी समस्त कारलगामधील ग्रामपंचायत सदस्य व व पंचायत अधिकारी उपस्थित होते. गावातील सभासदांनी याविषयी जनतेला माहिती दिली. आणि ज्या सुविधांचा अभाव आहे त्या सर्व पी.डी.ओ. मॅडम समोर मांडण्यात आल्या. यासाठी पंचायत उपाध्यक्ष श्री. रवींद्र बाळाराम सुतार, श्री. संजय अनंत पाटील, श्री. परशुराम यल्लारी घाडी, सौ. अंकिता संदीप सुतार, सौ. पुष्पा पुंडलिक आळवनी आणि सौ. वैष्णवी विष्णू काद्रोळकर या सर्वानी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta