खानापूर (प्रतिनिधी) : गणेबैल (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेचा इयत्ता सातव्या विद्यार्थी चैतन्य पुंडलिक माजगावकर याने नुकताच झालेल्या जिल्हा पातळीवरील उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
त्याबद्दल चैतन्य मजगावकरचे खानापूर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
त्याला मुख्याध्यापक एस. टी. पाटील व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta