Monday , September 21 2026
Breaking News

एचव्हीके मराठी विद्यानिकेतन विद्यार्थ्यांचे क्रीडा प्रकारांमध्ये यश

Spread the love

 

निपाणी : येथील मराठा मंडळ संचालित श्रीमती एचव्हीके मराठी विद्यानिकेतन शाळेने चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या विविध पातळीवरील स्पर्धेमध्ये शाळेमधून भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केले. वैयक्तिक खेळ प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेले विद्यार्थी- विद्यार्थिनी 100 मीटर धावणे तेजस माळी आणि प्राची हजारे, लांब उडी हार्दिक चौगुले, बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सेजल जगताप आणि श्रेयस अमित सूर्यवंशी, सांघिक खेळामध्ये 400 मीटर रिले तेजस माळी, प्रवीण सुतार, श्रेयस पवार, अब्रार सय्यद, 400 मीटर रिले मुली ऋतुजा पाटील, अक्षता पाटील, श्रद्धा नलवडे, योगासनामध्ये कुणाल शिंदे, ओंकार खपले, संदेश पसारे, श्रेयस पवार, प्रतीक वारके, मुलींमध्ये तनिष्का पवार, आर्या कंगळे, प्राची हजारे, श्वेता देशमुख, श्रुती देसाई, सिद्धी चव्हाण, प्रज्ञा कराळे या स्पर्धकांनी यश संपादन केले.
विजेत्या स्पर्धकांना संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कदम, चेअरमन राजेश कदम, संगीता कदम, मुख्याध्यापक बी. आर. मोहिते, शारीरिक शिक्षण शिक्षक श्री. संजय पाटील सर, श्री. जयहिंद खपले सर आणि शिक्षक शिक्षिकांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले. विजेत्या स्पर्धकांचे कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *