खानापूर (प्रतिनिधी) : खेमेवाडी (ता. खानापूर) येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक अजय काळे हे विद्यार्थी व एसडीएमसी तसेच पालकांशी उर्मट वागतात, विद्यार्थ्यांना मारबडव करतात. त्यामुळे पहिलीच्या वर्गात विद्यार्थी जाण्यास घाबरतात. त्यामुळे पहिलीचा वर्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे. अशा शिक्षकाची उचल बांगडी करावी, अशा मागणीचे निवेदन खेमेवाडी शाळेच्या एसडीएमसीच्या वतीने तसेच पालकांच्या वतीने तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांच्या नेतृत्वाखाली बीईओ राजश्री कुडची यांना देण्यात आले आहे.
यावेळी बीईओ राजश्री कुडची यांनी निवेदनाचा स्विकार करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
Belgaum Varta Belgaum Varta