खानापूर (प्रतिनिधी) : काटगाळीत (ता. खानापूर) येथे सालाबाद प्रमाणे यंदाही २७ व्या वर्षी होणाऱ्या पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ सोमवारी दि. ३ रोजी पार पडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप शंकर पाटील होते.
प्रास्ताविक बाबू बस्तवाडकर यांनी केले. यावेळी मुहूर्तमेढ भाजप नेते व श्री महालक्ष्मी ग्रूपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते रोवण्यात आली.
यावेळी दीपप्रज्वलन तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विविध फोटोचे पुजन उपस्थित पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर हभप गणपती सांगलीकर, हभप व अर्बन बॅंक संचालक अशोक नार्वेकर, हभप अशोक पाटील, बाळकृष्ण पाटील, मर्याप्पा बरूकर, ग्राम पंचायत संघटना अध्यक्ष विनायक मुणगेकर, तुकाराम मनगुतकर, वसंत केसरेकर, संजय पाटील, नारायण पाटील, रवी पाटील, मनोहर बरूकर, शिवाजी चौगुले, सातेरी चौगुले, हणमंत मसुरकर, राजू कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पाहुण्याची भाषणे झाली.
बोलताना भाजप नेते विठ्ठल हलगेकर म्हणाले की, वारकरी हे समाजात शांती भक्तीचा प्रसार करतात, पूर्वीपासून संतानी हा प्रसार केला आहे. शिवाजी महाराजांना संताचा आशिर्वाद होता. ही परंपरा कायमची आहे. तेव्हा गावातून वारकरी परंपरा कायम ठेवा, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार बाबू बस्तवाडकर यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta