खानापूर (तानाजी गोरल) : गुंजी माउली देवी यात्रोत्सवात परंपरागत पद्धतीने दरवर्षी पालखी प्रदक्षिणेनंतर गुजी पंचक्रोशीतील शेतकरी आपल्या बैलजोड्या शृंगारून मंदिराभोवती पळविण्याची प्रथा आहे. माउली देवी हे पंचक्रोशीतील आराध्य दैवत असून वर्षभर बैलजोडीचे संरक्षण व्हावे, कोणत्याही प्रकारची रोगराई किंवा बापा बैलजोडीला होऊ नये म्हणून येथील शेतकरी माउली देवीला नवस बोलतात विजयादशमी दिवशी मंदिराभोवती बैलजोड्या फिरवितात. मात्र यावर्षी जिल्ह्यात लम्पीस्कीन हा रोग फैलावत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रोत्सवात बैलजोडी पळविण्यावर बंदी घातली आहे. शिवाय मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष राजाराम देसाई यांनी उत्सवात बैलजोड्या आणू नयेत, असे आवाहन केले आहे. गुंजी येथील जागृत देवस्थान श्री माउली देवीचा यात्रोत्सव विजयादशमी बुधवार दि. ५ पासून प्रारंभ होत आहे. गुंजी माउली देवी ही नवसाला पावणारी देवी असा लौकिक सर्वदूर पसरल्याने गोवा, महाराष्ट्र, पुणे, मुंबई, बेळगाव, खानापूर, लोंढा, रामनगरसह गुंजी, माणिकवाडी, पंचक्रोशीतील हजारो भाविक उत्सवात देवीचे दर्शन घेतात. गुंजी माउली देवी ही पार्वतीचा अवतार समजला जात असल्याने या ठिकाणी कोणतेही बळी देण्यात येत नाहीत. त्यामुळे देवीला खण – नारळाची ओटी साडीचोळी सोन्या – चांदीचे दागिने तुलाभार, अशा पद्धतीने यात्रोत्सव काळात नवस फेडले जातात. बुधवार दि. ५ पासून उत्सवाला प्रारंभ होणार असून शनिवार दि. ८ रोजी यात्रेची सांगता होणार आहे. बुधवार दि. रोजी सकाळी गुंजी येथील श्री माउली देवी. ८ वा इंगळ्या श्री माउली देवीस अभिषेक व ११ वा. देवी शृंगारण्याचा विधी, दुपारी २ वा श्री माउली देवीच्या पालखीची गावातून सवाद्य मिरवणूक व मंदिरास प्रदक्षिणा नंतर मागणीच्या बैलजोड्या फिरविणे व श्यामसुंदर केशकामत यांच्याकडून प्रसाद सायंकाळी मानकऱ्यांकडून ओटी भरणे, इंगळ्या व रात्री वा शेजारती व प्रसाद गुरुवार दि. ६ रोजी सकाळी ८ वा. इंगळ्या देवीस ओटी भरणे, तुलाभार, नवस फेडणे इत्यादी धार्मिक कार्यक्रम दुपारी १ वा महाप्रसाद सायंकाळी ८ वा. शेजारती व प्रसाद, रात्री १० वा. सोशल फाउंडेशन गुंजी पुरस्कृत डाकू संग्राम नाट्यप्रयोग, शुक्रवार ७ रोजी सकाळी ८ वा. इंगळ्या ओटी भरणे तुलाभार नवस फेडणे इत्यादी धार्मिक कार्यक्रम, रात्री ८ चा शेजारती व प्रसाद शनिवार ८ रोजी सकाळी ८ वा इंगळ्या ओढी भरणे, तुलाभार, नवस फेडणे इत्यादी धार्मिक कार्यक्रम व सायंकाळी ५ वा श्री माउली देवीस महानैवेद्य व श्रीदेवी भंडारण्याचे गान्हाणे होऊन उत्सवाची सांगता होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta