खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने खानापूरातील मऱ्याम्मा मंदिर हलकर्णी क्रॉस येथे शस्त्र पूजेचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी सनातन संस्थेचे साधक कोनेरी कुमरतवाडकर यांचे शस्त्र पूजनचे महत्व आणि आजचे चाललेले याचे दिखाविकरण याबद्दल मार्गदर्शन ठेवण्यात आले होते.
कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे तालुका अध्यक्ष गोविंदराव किरमिटे, बजरंग दल संयोजक नंदकुमार निट्टुरकर, तालुका उपसंयोजक किरण अष्टेकर, शाखाप्रमुख भरत फाटके, अभिजित पाटील, राहुल बजनत्री, जानबा शिंदे, मंजुनाथ दनडगल, राहुल पाटील, गौरव पाटील, हणमंत सुतार, मोहन हुंदरे, महेश तोरगल, गांधीनगर, हलकर्णी, खानापूर, संनहोसुर, निडगल, हलशी, नंदगड, मोदेकोप, किरावळे, जांबोटी व तालुक्यातील इतर सर्व भागांतून कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta