Sunday , July 26 2026
Breaking News

दुर्गामाता विसर्जनावेळी नदीला अचानक पूर 7 जणांचा मृत्यू

Spread the love

 

कलकत्ता : पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यात दुर्गामुर्ती विसर्जना वेळी नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल (दि.06) बुधवारी संध्याकाळी जलपाईगुडी जिल्ह्यातील मलबाजार भागातील माल नदी परिसरात घडली. दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान झालेल्या या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांप्रती शोक व्यक्त केला आहे. दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल (दि.06) बुधवारी सायंकाळी दुर्गा मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नदीवर मोठ्या संख्येने लोक पोहोचले होते. या दरम्यान अचानक पाण्याची पातळी वाढू लागली. यामुळे लोकांची तारांबळ उडाली, बघता बघता यामध्ये सात जणांचा बुडून मृत्यू झाला तर 40 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *