खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) गावच्या तिघांना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल एन. व्ही. देसाई मुख्याध्यापक मराठी शाळा मच्छे, श्रीमती शकुंतला कुंभार मुख्याध्यापिका मराठी शाळा सुळगे (येळ्ळूर), विलास सावंत मुख्याध्यापक मराठी शाळा चिरमुरे गल्ली खानापूर यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी आणि अंतरराज्य पुरस्कार वितरण समिती चिकोडी यांच्या विद्या माने कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या तीन राज्यातून आंतरराज्य गौरव पुरस्काराने गर्लगुंजी गावच्या तिघांना ही म्हैसूर फेटा, म्हैसूर हार, सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले. हा कार्यक्रम बेळगाव अशोक नगर येथील धर्मनाथ भवन येथे नुकताच पार पडला.
यावेळी गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर, माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, हिंगोलीचे आमदार निलेश लंके, कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे, आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta