खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) संचालित श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित लैला शुगर्सच्या गळीत हंगामाचा शुभारंभ ऊसाची मोळी पुजन व गव्हाणीत ऊस टाकून करण्यात आला.
यावेळी गळीत हंगामाच्या कार्यक्रमाला राज्यसभा सदस्य इराणा कडाडी, प पू रामदास महाराज विश्वात्मक गुरूदेव सिध्दाश्रम मठ तोपिनकट्टी, प पू चन्नबसव देवरू रूद्र स्वामी मठ अवरोळी, प पू शंभू लिंग शिवचार्या महास्वामी हिरेमन्नोळी, प पू पिरनाथ महाराज कुंभार्ली, प पू सिंग नाथ महाराज बालेवाडी मठ. प पु भयंकर नाथजी महाराज डोंगरगाव मठ, प पू दिव्य चेतन शिवपुत्र महास्वामी चिक्कमन्नोळी, प पू अडविसिध्देश्वर स्वामी हिडकल, प पू पिरयोगी महाराज किरावळे, प पू चन्नवीर देवरू नंदगड, प पू मृत्यूजंय स्वामी गंदिगवाड यांच्या सान्निध्यात पार पडला.
प्रारंभी लैला शुगर्सच्या कार्यस्थळावर भाग्यलक्ष्मी साखर कारखान्याचे संस्थापक कै. निळकंठराव सरदेसाई यांच्या पुतळा चौथरा भुमिपुजन करण्यात आले.
यावेळी चेअरमन विठ्ठल हलगेकर म्हणाले की, कारखाना खानापूर तालुक्यातील भागधारकाच्या मालकीचा असल्याने आज साखर कारखानदारी नुकसानीत आहे. मात्र खानापूर तालुक्यातील शेतकरी, कामगार वर्गाचा हिताचा विचार करून आम्ही ही जोखीम उचलली आहे. तेव्हा तालुक्यातील शेतकरी वर्गाने सहकार्याची भूमिका ठेवावी. एफआरपी पेक्षा ७५ रूपये जास्त दर दिला आहे. यावर्षी ही तोच प्रयत्न राहिल. २५०० रूपये पहिला हप्ता दर घोषीत करण्यात आला आहे. तर पाच लाख टन ऊसाचे गाळपाचे उद्दिष्ट असून शेतकरी वर्गाने उस पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी शेतकरी लैला शुगर्सचे संचालक मंडळ तालुक्यातील आजी-माजी लोक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी एम. डी. सदानंद पाटील यानी प्रतीचा आढावा सादर केला.
Belgaum Varta Belgaum Varta