खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) गावच्या कणवीजवळील गर्लगुंजी- बेळगाव रस्त्यावर भला मोठा खड्डा पडून महिना होत आला. मात्र खानापूर पीडब्लूडी खात्याने भर रस्त्यावरील खड्ड्यात ट्रॅक्टर भर शेडूमिश्रीत माती सोडून गेली आहे. खड्डा दुरूस्तीचे काम राहिले बाजुला या मातीच्या ढीगामुळे वाहतुकीला धोका झाला आहे.
महिना ओलांडुन गेला तरी सबंधित खात्याने लक्ष दिले नाही. खानापूर तालुक्यातील अधिकारी वर्गावर लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्याने खानापूर तालुक्यातील अधिकारी सैराट झाले आहेत. त्यामुळे तालुक्याचा विकास तर बाजुला राहिला. तर दुसरीकडे अधिकारीच तालुक्याला डोके दु:खी झाले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta