Sunday , July 26 2026
Breaking News

चन्नराज हट्टीहोळी यांचा उड्डाणपूल उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार

Spread the love

 

बेळगाव : केपीसीसीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी बुधवारी बेळगावात आयोजित केलेल्या तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपूल उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.
रेल्वे विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाकडे काँग्रेस पक्षाच्या दोन आमदारांकडे दुर्लक्ष करून शिष्टाचाराचा भंग केला. या पार्श्वभूमीवर मी कार्यक्रमाला उपस्थित न राहता माझा निषेध नोंदवत आहे, असे चन्नराज हट्टीहोळी यांनी निवेदनात म्हटले आहे. विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची विनंती केली जाईल असे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *