खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जत-जांबोटी रस्त्यावरील जांबोटी क्राॅसवरील बालकल्याण खात्याच्या कार्यालयासमोर बांधण्यात आलेल्या सीडीेचे काम महिना होऊन गेला तरी याकडे खानापूर पीडब्ल्यूडी खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या मयेकर नगर, विद्या नगरातील नागरिकांना रस्ता बंद झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे या भागातील नागरिकांतून नाराजी पसरली आहे.
विद्यानगर, मयेकर नगर वसाहतीतील नागरिकांना बसस्थानकाला जाण्यासाठी, तसेच बाजाराला जाण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग नाही. दुसरीकडे कच्चा रस्त्यावर पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. जांबोटी रस्त्यावरील सीडीेचे कामही निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. त्यातच वेळ काढूपणा केला जात आहे.
तेव्हा नागरिकांची समस्या दुर करण्यासाठी सीडीेचे काम त्वरीत पूर्ण करून रस्ता दुरूस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta