
खानापूर : खानापूर तालुक्यातील कोडचवाड येथे श्री 108 परसमसागर मुनी महाराज चातुर्मास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात आज खानापूर तालुका महिला मोर्चा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांनी सहभाग दर्शविला.
यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, जैन धर्मातून अहिंसा परमोधर्माची शिकवण मिळते. अहिंसा परमोधर्माची समाजाला नितांत गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
जैन मुनीजींनी यावेळी डॉ. सोनाली सरनोबत यांना राजकीय कारकिर्दीबद्दल आशिर्वाद दिला. भाजपचे कार्यकर्ते रवी हट्टीहोळी, भरतेश उपाध्ये, महावीर हुडेध, राजू कोचेरी, राजू सागर, पारिश हारोगोप्पा, नवीन कोचेरी, बाहुबली अज्जन्नावर, भरतेश कांची, रवी चौगला, यांच्यासह स्थानिक नेते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली व त्यानंतर प्रवचन झाले.
Belgaum Varta Belgaum Varta