खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचा जागर करण्यासाठी तसेच मराठी भाषिकांची अस्मिता ज्वलंत करण्यासाठी संपूर्ण तालुक्यात तुकाराम गाथा व ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी काल रविवार दि. 16 ऑक्टोबर रोजी करंबळ येथे जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.
करंबळ येथील प्रतिष्ठित नागरिक निवृत्त शिक्षक बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी करंबळ येथील समितीप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होती.
यावेळी भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, यशवंत बिर्जे, रुक्मांना झुंजवाडकर, नारायण कापोलकर, मरू पाटील डी. एम. भोसले कौंदल (हरूरी), महादेव घाडी तसेच करंबळ, येथील ग्रामस्थ उपस्थित होते. मरू पाटील (हरूरी) यांनी आपले विचार मांडले तर यशवंत बिर्जे यांनी पालखी सोहळ्याचे उद्दिष्ट सांगितले.
के. एम. घाडी करंबळ, पुंडलिक रामचंद्र पाटील करंबळ, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर महादेव घाडी यांनी आभार मांडले.
Belgaum Varta Belgaum Varta