खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी भाषा आणि मराठी अस्मिता टिकविण्यासाठी तालुक्यात ज्ञानेश्वरी पालकी सोहळा व तुकाराम गाथा पूजन तालुक्यातील गावोगावी करण्याचा निर्धार करण्यात येत असून त्याची जनजागृती करण्यात येत आहे.
आज बुधवारी लालवाडी, कारलगा, शिवोली, अल्लेहोळ, हडलगा, खैरवाड, हेब्बाळ, नंदगड या गावांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी समिती नेते आबासाहेब दळवी, यशवंत बिर्जे, मुरलीधर पाटील, गणपत गावडे, प्रकाश चव्हाण, डी. एम. गुरव, विठ्ठल गुरव, नारायण कापोलकर, दीपक देसाई, प्रल्हाद मादार, ईश्वर बोबाटे, राजू लक्केबैलकर, यल्लप्पा पाटील, शिवाजी पाटील, गंगाराम पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta