Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जनजागृती

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी भाषा आणि मराठी अस्मिता टिकविण्यासाठी तालुक्यात ज्ञानेश्वरी पालकी सोहळा व तुकाराम गाथा पूजन तालुक्यातील गावोगावी करण्याचा निर्धार करण्यात येत असून त्याची जनजागृती करण्यात येत आहे.
आज बुधवारी लालवाडी, कारलगा, शिवोली, अल्लेहोळ, हडलगा, खैरवाड, हेब्बाळ, नंदगड या गावांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी समिती नेते आबासाहेब दळवी, यशवंत बिर्जे, मुरलीधर पाटील, गणपत गावडे, प्रकाश चव्हाण, डी. एम. गुरव, विठ्ठल गुरव, नारायण कापोलकर, दीपक देसाई, प्रल्हाद मादार, ईश्वर बोबाटे, राजू लक्केबैलकर, यल्लप्पा पाटील, शिवाजी पाटील, गंगाराम पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *