Wednesday , March 4 2026
Breaking News

खानापूर चिरमुरकर गल्लीतील मराठी शाळेत पेव्हर्स कामाचा शुभारंभ

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील चिरमुरकर गल्लीतील उच्च प्राथमिक मराठी मुलांची व उच्च प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेच्या पटांगणात एमएलसी हणमंत निराणी यांच्या फंडातून पेव्हर्स बसविण्याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.
यावेळी बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, एसडीएमसी अध्यक्ष धाकटा गुरव, भाजप तालुका सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, भाजप नेते बाळू सावंत, प्रकाश निलजकर, राजू जांबोटकर, नगरसेवक आप्पय्या कोडोळी, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चिरमुरकर गल्लीतील उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष धाकटा गुरव यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. तर बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या हस्ते पेव्हर्स बसविण्याचा कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक शिक्षक जे. पी. पाटील यांनी केले. तर प्रभारी मुख्याध्यापक विलास सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना बेळगाव जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कचेरी म्हणाले की, आपले भाजप पक्षाचे नेते व एमएलसी हणमंत इराणी यांच्या प्रयत्नातून व आपल्या फंडातून मराठी शाळेच्या पटांगणात पेव्हर्स बसविण्यासाठी निधी मंजुर करून दिला त्या कामाचा शुभारंभ करण्यात आला, असे विचार मांडले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते, शाळेचे एसडीएमसी सदस्य, शिक्षकवर्ग उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *