खानापूर (प्रतिनिधी) : कारलगा (ता. खानापूर) येथील वामन बळवंत पाटील यांच्या राहत्या घरावर मुसळधार पावसामुळे सावरीचे झाड घरावर कोसळले. या घटनेची माहिती मिळताच खानापूर तालुक्याचे माजी आमदार आणि जिल्हा मध्यवर्ती बँक विद्यमान संचालक अरविंद पाटील यांनी रात्रीच्या वेळी कारलगा येथे मुसळधार पावसात उपस्थिती लावून मदत केली.
त्यांनी लागलीच अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि आपण स्वतःहून सढळ हाताने आर्थिक सहाय्य केले.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच याचवेळी गावातील नागो नारायण यळ्ळूरकर यांच्या घरावरचे छत वाऱ्यामुळे उडून गेल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.
त्यामुळे कारलगा गावाच्या नागरिकांतून समाधान पसरले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta