Monday , September 21 2026
Breaking News

विविध मागण्यांसाठी कामगार विभागाच्या कार्यालयाला बांधकाम कामगारांचा घेराव

Spread the love

 

बेळगाव : बांधकाम कामगारांच्या प्रश्नांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत कडोली गावातील बांधकाम कामगारांनी बेळगावमधील कामगार विभागाच्या कार्यालयाला घेराव घालून आंदोलन केले.
कामगार कार्डाकरिता अर्ज करूनही अर्जदार कामगाराला लवकर कार्ड मिळत नाही, तसेच ज्यांच्याकडे कामगार कार्ड आहे, त्यांना सरकारी सुविधा मिळत नाहीत, अशी तक्रार यावेळी बांधकाम कामगारांनी केली.
शिक्षण सुविधा, लग्नाचे अनुदान, बस पास, किट या कोणत्याच सुविधा कार्डधारकांना मिळत नाहीत. गेल्या महिन्यात कामगार विभागाने कामगारांना बस पास देण्याचा आदेश काढला होता. मात्र आता ती वेबसाईट बंद करण्यात आली आहे. याशिवाय विवाह भत्ताही दिला जात नाही, अशी तक्रारही यावेळी कार्डधारकांनी केली.
विद्यार्थ्याना स्टायपेंड वितरित केले जावे, बांधकाम कामगारांच्या मुलांना लॅपटॉपचे वाटप करण्यात यावे, कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या मजुराच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची भरपाई द्यावी, बस पासचे वितरण तातडीने सुरू करावे, शिक्षण सुविधा, लग्नाचे अनुदान, बस पास, किट आदी सुविधा विनाविलंब द्याव्यात, अशा मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले.
यावेळी बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष एन. आर. लातूर, सुजित मुळगुंद, सोमनाथ पाटील, गोरक डौरी, हिरामणी होनगेकर, इराप्पा पाटील, कल्लाप्पा पाटील यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *