बेळगाव : कित्तूर उत्सव आटोपून परतत असताना कारच्या धडकेत दोन पादचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना कित्तूर हद्दीत पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री घडली.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, खानापुर तालुक्यातील करविनकोप्प गावातील बाळाप्पा तळवार (३३) आणि केराप्पा तळवार (३६) हे कित्तूरला उत्सवानिमित्त गेले होते. उत्सव आटोपून घरी परतत असताना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास बेळगावहून धारवाडकडे जाणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची नोंद कित्तूर पोलिस ठाण्यात झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta