Monday , September 21 2026
Breaking News

खानापूरात दीपावली पाडव्यानिमित म्हैस पळविण्याची प्रथा

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : दिवाळी सणानिमित्त खानापूर शहरासह तालुक्यात अनेक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. त्याचप्रमाणे खानापूर शहरातील लक्ष्मी मंदिराच्या पटांगणात निंगापूर गल्लीतील निलेश सडेकर यांनी बुधवारी दि. २६ रोजी येथील लक्ष्मी मंदिराच्या आवारात सालाप्रमाणे यंदाही धनगरी वाद्यासह लक्ष्मी मंदिरपासून घोडे गल्ली, स्टेशन रोड, महामार्गावरून निंगापूर गल्लीसह म्हशी पळविण्यात आल्या.

प्रारंभी लक्ष्मी मंदिरात भाजप युवा नेते पंडित ओगले यांनी पुजा करून कार्यक्रमाची सुरूवात केली.
त्यानंतर निलेश साडेकर यांनी म्हैस पळविण्यास सुरूवात केली. यावेळी निलेश सडेकर, विनायक सडेकर, अनंत सडेकर, आदेश सडेकर, रजत सडेकर व सामाजिक कार्यकर्ते महादेव काद्रोळकरसह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *