खानापूर (प्रतिनिधी) : दिवाळी सणानिमित्त खानापूर शहरासह तालुक्यात अनेक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. त्याचप्रमाणे खानापूर शहरातील लक्ष्मी मंदिराच्या पटांगणात निंगापूर गल्लीतील निलेश सडेकर यांनी बुधवारी दि. २६ रोजी येथील लक्ष्मी मंदिराच्या आवारात सालाप्रमाणे यंदाही धनगरी वाद्यासह लक्ष्मी मंदिरपासून घोडे गल्ली, स्टेशन रोड, महामार्गावरून निंगापूर गल्लीसह म्हशी पळविण्यात आल्या.
प्रारंभी लक्ष्मी मंदिरात भाजप युवा नेते पंडित ओगले यांनी पुजा करून कार्यक्रमाची सुरूवात केली.
त्यानंतर निलेश साडेकर यांनी म्हैस पळविण्यास सुरूवात केली. यावेळी निलेश सडेकर, विनायक सडेकर, अनंत सडेकर, आदेश सडेकर, रजत सडेकर व सामाजिक कार्यकर्ते महादेव काद्रोळकरसह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta