खानापूर (प्रतिनिधी) : शिंदोळी (ता खानापूर) येथील ग्राम दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार करून नुतन मंदिराचा पाया खोदाई शुभारंभ दीपावलीच्या शुभमुहुर्तावर नुकताच करण्यात आला.
यावेळी बेळगाव जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई तसेच ग्राम पंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमोद कोचेरी, बाबूराव देसाई आदींच्या हस्ते पुजन करून तसेच कुदळ मारून मंदिराच्या इमारतीच्या कामाचा शुभारंभ केला.
यावेळी बोलताना बेळगांव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले की, मंदिर हे गावचे भूषण आहे. तेव्हा मंदिराची उभारणी सर्वाच्या मदतीने झाली पाहिजे. गावकर्यांनी मंदिरात पुजा आर्चा, स्वच्छता नेहमीच ठेवली पाहिजे. तरच मंदिराचे पावित्र्य राहते. व मंदिरामुळे गावात सुख समाधान नांदते असे विचार व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला तालुक्यातील नेते मंडळी, ग्राम पंचायतीचे सदस्य, गावची पंचमंडळी, तसेच गावचे नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta