खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रिडांगणावर उद्या बुधवारी दि. ९ रोजी सायंकाळी चार वाजता कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई जनस्पंदन सभेला उपस्थित राहाणार आहेत, अशी माहिती खानापूर तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल यांनी तालुका भाजपच्या कार्यालयात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे प्रथमच खानापूर तालुक्यात येत आहेत. तेव्हा स्वागताची तयारी युध्दपातळीवर सुरू आहे. त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री बी. एस. यडियुरापा व इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सभेला बेळगाव खानापूर भागातून जवळपास ३० हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती दिली.
यावेळी व्यासपीठावर बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, बाबूराव देसाई, किरण यळ्ळूरकर, जोतिबा रेमाणी, सुरेश देसाई, धनश्री सरदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक बसू सानिकोप यांनी केले.
यावेळी प्रमोद कोचेरी, बाबूराव देसाई, धनश्री सरदेसाई आदीनी मार्गदर्शन केले.
सभेला खानापूर तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार राजेंद्र रायका यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta