खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका लोकसंस्कृती नाट्य कला संस्था प्रस्तुत शाहिर अभिजित कालेकर व कलाकारानी खानापूर येथील अर्बन बँक समोरील पिंपळकट्यावर आयोजित जागर लोकसंस्कृतीचा कार्यक्रम शनिवारी रात्री पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसंस्कृती नाट्यकला संस्थेचे संस्थापक दादासाहेब तोपीनकट्टी उपस्थित होते.
तर कार्यक्रमाला पीएलडी बँक चेअरमन मुरलीधर पाटील, भाजप तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, सुरेश देसाई, निरंजन सरदेसाई, भाजप युवा नेते पंडित ओगले, उदय भोसले, धनश्री सरदेसाई, राजेंद्र रायका, गुंडू तोपीनकट्टी, अँड चेतन मणेरीकर, भैरू कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत शाहिर अभिजित कालेकर यांनी केले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व संगीत साहित्याचे पुजन करण्यात आले.
यावेळी जागर लोकसंस्कृतीचा उपक्रम खानापूर शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात व्हावा. तालुक्यातील जनतेला लोकसंस्कृतीचा लाभ मिळावा याबद्दल उपस्थित पाहुण्यांनी विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत कालेकर यांनी केले.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी अध्यक्ष राजाराम मादार, गोपाळ घाडी, महेश कुंभार, सुरापा पाटील, नागेश बोबाटे, एम. व्ही. चोर्लेकर, नामदेव पाटील, नानाजी शिवणगेकर, शिवाजी बाचोळकर आदी संचालकांनी परीश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta