Sunday , July 26 2026
Breaking News

कावळेवाडीत किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : कावळेवाडीत राष्ट्रपिता म. गांधी सामाजिक संस्था व वाचनालयतर्फे दरवर्षीप्रमाणे किल्ला स्पर्धेचे याही वर्षी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात गावातील देवालयात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी पी. आर. गावडे उपस्थित होते.
प्रांरभी शिवप्रतिमेचे पूजन मोहन तरवाळ यांच्याहस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी केले. लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य सलग चार वर्षे वाचनालयच्या माध्यमातून केले जाते. शिवराय हे दैवत आहे. किल्ला प्रतिकृतीतून इतिहास जिवंत ठेवला जातो. किल्ले हे शौर्य, पराक्रमाचे प्रतिक आहे. बालचमूनी आकर्षक असे विविध किल्ले प्रतिकृती तयार करून शिवरायांचा इतिहास जागवला आहे.
मान्यवरांचे स्वागत पृथ्वी रा.जाधव हिने केले. यावेळी मोहन तरवाळ यांचा शाल, सन्मानचिन्ह, श्रीफळ देऊन मोहनराव मोरे यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
गावातील धावपटू प्रेम य. बुरूड याचाही शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
स्पर्धेचे पहिले पाच क्रमांक..
प्रथम-गायत्री दी. सुतार (शिवनेरी), द्वितीय…सूजल भ. मोरे (सिंहगड), तृतीय…ओंकार भा. बाचीकर (प्रतापगड), चौथा क्रमांक.. प्रेम य. बुरूड (पारगड), पाचवा… सूजल द. यळुरकर (सिंहगड) विजेत्यांना रोख रक्कम, मेडल देऊन गौरव आले
यावळी मोहनराव मोरे, यशवंतराव मोरे, पी. आर. गावडे यांनी आपले विचार व्यक्त करून बालचमूनी अथकपरिश्रम घेऊन किल्लेप्रतिकृति केले त्यांचे कौतुक केले. शिवरायांचा विचार आजच्या पिढीला आदर्शवत आहे. चरित्र वाचून बोध घ्यावा असे मौलिक विचार व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर मोहनराव मोरे, मोहन तरवाळ, रवळू मा.मोरे, मोणापा य. मोरे, यशवंतराव मोरे, युवराज प.नाईक, रघुनाथ बाचीकर, एम. पी. मोरे, अभिषेक सुतार,अभियंता सुहास गुरव (टिळकवाडी) आदी मान्यवर उपस्थित होते.
मोहन तरवाळ यांनी ही स्पर्धा पुरसृकत केली होती
सुहास शं. गुरव यांनी प्रेम बुरूडला ट्रॅकसूट, शूज दिले.
सूत्रसंचालन व आभार मनोहर प. मोरे यांनी मानले.
यावेळी चाळीस किल्ले प्रतिकृती लहान मुलांनी तयार करून
गावात शिवरायांचा इतिहास जागवला होता.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *