खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतीच्या वार्ड नंबर ६ मध्ये १५ व्या वित्त आयोग निधीतून कूपनलिका खुदाई वार्ड नंबर सहाच्या नगरसेविका सौ. मिनाक्षी बैलूरकर यांच्या हस्ते पुजन करून करण्यात आले.
यावेळी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी यांच्या हस्ते मशीनला पुष्पहार घालून कूपनलिका खोदाई कामाचा शुभारंभ केला.
यावेळी खानापूर नगरपंचायतीचे स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलूरकर यांनी श्रीफळ वाढविले.
यावेळी बोलताना नगरसेविका सौ. मिनाक्षी बैलूरकर म्हणाल्या की, घोडे गल्लीत गेल्या कित्येक वर्षापासुन पाण्याची सोय व्हावी. यासाठी कूपनलिका खोदण्याचा सतत प्रयत्न होत होता. याचा योग आज मिळाला. म्हणून सरकारच्या पंधराव्या वित्त आयोग निधीतून कूपनलिका मंजुर करण्यात आली.
व कूपनलिका खुदाईचा शुभारंभ करण्यात आला.
त्यामुळे घोडे गल्लीतील नागरिकांची पाण्याची सोय झाली.
यावेळी खानापूर नगरपंचायतीचे स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलूरकर, घोडे गल्लीत नागरिक प्रदिप दलाल, निलेश सडेकर, मोहन गोरल, मनिषा पाटील, रेणूका झाले आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta