खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याचे लोकप्रिय नेते आणि समाजिक कार्यकर्ते इरफान तालिकोटी यांना कर्नाटक काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेस पक्षाकडे दिले.
इरफान तालिकोटी हे खानापूर मतदारसंघामधून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. केपीसीसी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी आव्हान केल्याप्रमाणे काँग्रेस पक्षातून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने खानापूर काँग्रेस पक्षाचे नेते इरफान तालिकोटी यांनी आज गुरूवारी दि. १७ रोजी खानापूर तालुक्यातून उमेदवारीसाठी २ दोन लाख रूपये डीडी देऊन आपली प्रबळ दावेदारी दर्शविली.
यावेळी त्यांच्या सोबत खानापूर तालुक्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते वाय. बी. गुपीत व माजी मंडळ प्रधान व ज्येष्ठ नेते महांतेश संगोठी, किरण पेडणेकर व खानापूर युवा काँग्रेस अध्यक्ष, माजी तालुका पंचायत सदस्य इम्रान तालिकोटी तसेच युवा अर्बन अध्यक्ष अमर गुरव, युवा काँग्रेस जनरल सेक्रेटरी ईलीयाज करजगी व जहीर बेपारी, लालासंग रजपूत, कमलाकांत गुरव, सुभाष गावकर, दत्तु गावकर व ओंकार रजपूत, हैदर शेख, प्रकाश गुरव, भुजंग कामति आदीनी बेंगळूर येथील केपीसीसी कार्यालयात उपस्थिती दर्शविली होती.
यामुळे खानापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष काँग्रेसच्या नव्या उमेदवाराच्या प्रतिक्षेत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta