कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची सलग संततधार सुरू असल्याने तसेच धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या जोरदार पावसाने पंचगंगेची पाणीपातळी इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे.
गेल्या चोवीस तासांमध्ये पंचगंगेच्या पाणीपातळीत दीड फुटांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे राधानगरी धरणही 50 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील इतर प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीमध्येही वाढ होत असल्याने पाणी पात्राबाहेर पडत आहे. वारणा, कडवी नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील बंधारे 41 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नद्यांच्या पातळीमध्ये सातत्याने पाणी वाढत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना इशारा देण्यात आला आहे. पंचगंगेची पाणीपातळी 39 फुटांवर गेल्यास इशारा समजला जातो, तर 43 फुट धोका समजला जातो.
कोल्हापूर जिल्ह्यातील दोन राज्य मार्ग आणि सात जिल्हा मार्ग बंद झाले असून, तेथे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. या शिवाय कागल, शिरोळ, भुदरगड येथील काही मार्ग बंद झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta