Monday , December 8 2025
Breaking News

शिवसेनेची कोल्हापूर शहर कार्यकारिणी बरखास्त : संजय मंडलिक

Spread the love

कोल्हापूर : शिवसेनेतून बाहेर पडलेले सर्व बेन्टेक्स आहेत. आता जे शिवसेनेत राहिले आहेत, ते लखलखीत सोने आहे, असा टोला लगावत खासदार संजय मंडलिक यांनी शिवसेनेची कोल्हापूर शहरातील सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असल्याचे आज (दि.१०) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सर्व शाखांची कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असून लवकरच नवीन कार्यकारिणी निवडण्यात येईल. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद कमी झालेली नाही. हे दाखवण्यासाठी गुरुवारी शिवसेनेचा भव्य मेळावा शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास शिवसेना नेते विनायक राऊत व संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  एक महिन्याच्या विशेष जनजागृती मोहिमेसह थेट कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूर : समाजात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *