Tuesday , March 3 2026
Breaking News

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, पंचगंगा नदी लागली उतरणीला, अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग वाढवला

Spread the love

 

कोल्हापूर : गेल्या आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात पावसाने धूमशान घातल्यानंतर गेल्या 24 तासांपासून जोर ओसरू लागला आहे. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये पुराचा धोका टळला आहे. पंचगंगा नदी काल स्थिर पातळीवर राहिल्यानंतर आता पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. दिलासादायक म्हणजे अलमट्टी धरणातूनही पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. अलमट्टीतून दीड लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील तीन बंधार्‍यांवरील पाणी ओसरल्याने वाहतूक पूर्ववत होण्यास मदत होणार आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत रात्रीपासून घट होऊ लागली आहे. आजपासून आठवडाभर गायब असलेल्या सूर्याचे दर्शन झाल्याने आणखी दिलासा मिळाला. आज सकाळी 10 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 37 फुट 9 इंच इतकी होती. पंचगंगेची इशारा पातळी 39 आहे, तर धोका पातळी 43 फुट आहे.
अलमट्टी धरणातील विसर्ग आणखी वाढवला
अलमट्टी धरणातून आज सकाळी सकाळी 10 वाजल्यापासून 1 लाख 50 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. याआधी धरणातून 1 लाख 25 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्यानंतर धरण प्रशासनाने धरणकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यामधील सर्वच नद्यांची पाणी पातळी कमी होण्यास मदत होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापुरातील प्रेमीयुगुलांचे मृतदेह जंगलात आढळले!

Spread the love  कोल्हापूर : कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या शेळेवाडीतील ओंकार उर्फ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *