Monday , December 8 2025
Breaking News

खासदार धैर्यशील मानेंच्या घरासमोर तगडा बंदोबस्त बहाल!

Spread the love

 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या घरासमोर शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धैर्यशील माने असो किंवा संजय मंडलिक हे दोन्ही खासदार शिंदे गटासोबत जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे. केवळ अधिकृत घोषणा करणे बाकी आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोल्हापूर पोलिसांनी धैर्यशील माने यांच्या रुईकर कॉलनी इथल्या घरी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.
खासदार संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा हमिदवाडा कारखाना कार्यस्थळावर पार पडला होता. या ठिकाणी बहुतांश कार्यकर्त्यांनी शिंदे गटाकडे जाण्याचा आग्रह धरला होता. सत्तेच्या बाजूने असेल, तर आपल्याला विकासकामे करून निधी खेचून आणता येईल अशा प्रकारची भूमिका या मेळाव्यामध्ये मांडण्यात आली.
या मेळाव्यानंतर खासदार संजय मंडलिक यांनी दिल्लीतून प्रतिक्रिया दिली होती. संजय मंडलिक म्हणाले की, चार पाच दिवसांपूर्वी लेबर कमिटीच्या निमित्तानं दिल्लीत आलो आहे. तेव्हा काही खासदारांनी मला शिंदे गटाच्या बाजूने येण्याची विनंती केली, पण कार्यकर्त्यांची भूमिका ऐकल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही. शिंदे गटासोबत जावं असा कार्यकर्त्यांचा निरोप आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व खासदारांशी साधकबाधक चर्चा करून मी निर्णय घेणार आहे.
ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचा प्रयोग पहिल्यांदा कोल्हापुरातच झाला होता हे खरं आहे, पण सत्तेचा फायदा शिवसेना पेक्षा आमच्या मित्रांना अधिक झाला. ज्यांच्या विरोधात मी लढलो ते दुसर्‍या बाजूने आहेत. त्यांचं काय होणार याचा विचार करावा लागेल. उद्धव साहेब हे मला माझ्या भावाप्रमाणे आहेत. विस्कटलेलं कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी आहे, पण दुर्दैवानं ते होताना दिसत नाही. मातोश्री किंवा कुठल्याही ज्येष्ठ नेत्यांनी माझ्याशी अद्याप बोलण्याचा प्रयत्न केलेला नाही.

About Belgaum Varta

Check Also

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  एक महिन्याच्या विशेष जनजागृती मोहिमेसह थेट कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूर : समाजात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *