Monday , December 8 2025
Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आक्रमक; शिवसैनिकांचीही धरपकड

Spread the love

 

कोल्हापूर : मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौर्‍यावर आहेत. दरम्यान, त्यांच्या दौर्‍याला ठाकरे गटाकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे. शिवसेना नेते संजय पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन करत होते. शिवसैनिक या ठिकाणी जमू लागल्यानंतर पोलिसांनी संजय पवार यांच्यासह काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौर्‍यात शिवसेनेने निदर्शने करणार असल्याची घोषणा केली होती. बंडखोर आमदार आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात येणार होती. ही निदर्शने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार होती. मात्र, त्यापूर्वीच शिवसैनिकांची धरपकड पोलिसांनी सुरू केली.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे एक पथक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या निवासस्थानी धडकले. आम्ही लोकशाही मार्गाने निदर्शने करणार होतो. लोकशाहीमध्ये आम्हाला तेवढा अधिकार नाही का, असा प्रश्न पवार यांनी केला. आम्ही शांततेच्या मार्गाने निदर्शने करणार होतो. मात्र, ही कारवाई कोणाला खूष करण्यासाठी सुरू आहे, असा सवाल पवार यांनी पोलिसांनी केला. यावेळी संजय पवार यांनी संजय राठोड यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. संजय राठोड यांच्याविरोधात आरोप करणारे आज गप्प का आहेत, असा सवाल पवार यांनी केला. किरीट सोमय्या, चित्रा वाघ हे संजय राठोड यांच्याविरोधात होते. आता मंत्रिमंडळात राठोड यांचा समावेश झाल्यानंतर मूग गिळून का गप्प आहेत, असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला.
शिवसैनिकांकडून अटकाव
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या गाडीसमोर शिवसैनिकांनी ठिय्या मांडला. संजय पवार यांच्यावर झालेली कारवाई चुकीची आणि दडपशाही करणारी असल्याचे शिवसैनिकांनी म्हटले. शिवसैनिकांना पोलिसांकडून बाजूला घेण्याची कारवाई सुरू झाली. त्यावेळी पवार हे स्वत: पोलिसांच्या कारमधून उतरले आणि शिवसैनिकांना शांततेचे आवाहन केले.

About Belgaum Varta

Check Also

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  एक महिन्याच्या विशेष जनजागृती मोहिमेसह थेट कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूर : समाजात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *