राजू पोवार : सीमाभागातील संघटनांचा कोल्हापूर आंदोलनात सहभाग
निपाणी (वार्ता) : सुळकुड (ता. कागल) येथून दूध गंगा नदीद्वारे इचलकरंजी येथे पाणी पुरवण्याची मोठी योजना आहे. त्यामुळे कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासणार आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होऊन पुन्हा शेतकरी अडचणीत येणार आहेत. त्यामुळे इचलकरंजी योजनेसाठी सीमाभागातील दूधगंगा नदीतून एक थेंबही पाणी देणार नाही. त्यासाठी लवकरच शेतकरी व विविध संघटनांची बैठक घेऊन बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी दिली. कोल्हापूर येथे झालेल्या सीमाभागातील शेतकऱ्यांच्या आंदोलनात ते बोलत होते.
कोल्हापूर येथे झालेल्या आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी हा इशारा दिला आहे. संघटनेचे रमेश पाटील, चिनू कुळवमोडे, अनंता पाटील, राजू खिचडे, अनिल कुरणे, एम. वाय. हवालदार, धनराज घाटगे, यांच्यासह सुळगाव, मतिवडे, हंचीनाळ, कोगनोळी, कारदगा, बारवाड, भोजसह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta