Friday , November 22 2024
Breaking News

पत्नीचा गळा चिरुन केला खून; पती अटकेत

Spread the love

 

कोल्हापूर जिल्ह्यातील घटना

शिरोली : मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पोटावर धारदार विळ्याने सपासप वार करून तसेच गळा चिरुन खून केला. खून करुन पती हातकणंगले पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. ही घटना बुधवारी दुपारी 2 वाजण्यासुमार गावाबाहेरील शेतवडीतील सुतार पांणद येथे घडली.

पोलिसांतून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की मयत पत्नीचे नाव कविता चंद्रकांत कोरवी (वय ३२) व आरोपी पती चंद्रकांत कोरवी (वय ४०, दोघेही रा. मुळगाव निमशिरगाव, ता. शिरोळ, सध्या रा. मौजे वडगाव) असे आहे. त्यांना दोन मुले असून यातील एक मुलगा मौजे वडगावात तर दुसरा मुलगा निमशिरगाव येथे असतो. चंद्रकांत हा आजोळ म्हणजे मौजे वडगाव येथे भोसले यांच्या घरी रहात होता. दोघेही गावात शेतमजूरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत होते. दोघांच्यात वारंवार वाद होत होते. चंद्रकांत कविताच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला मारहाण करत असे.

मंगळवारी रात्री दोघा पती पत्नीमध्ये वाद झाला होता. पण, रात्री झालेला वाद विसरुन कविता सकाळी सात वाजता प्रकाश चौगुले यांच्या शेतात उसाची लावण करण्यासाठी कामावर गेली होती. सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत कामाची वेळ असल्याने कविता दीड वाजेपर्यंत शेतात काम करत असल्याने चंद्रकांत तीला घरी बोलावण्यासाठी शेतात गेला होता. दोघेही घरी जाण्यासाठी सुतार पाणंद मधून निघाले असता, वाटेतच दोघांच्यात शाब्दिक वाद सुरू झाल्याने चौगुले यांच्या शेताजवळ चंद्रकांतने कविताच्या गळ्यावर व पोटावर विळ्याने सपासप वार केले. वर्मी वार झाल्याने जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कविता निपचित पडली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कविताच्या आंगावर ओढणी झाकून व आपली सायकल घटनास्थळाव टाकून चंद्रकांतने पोबारा करत हातकणंगले पोलिसात स्वतःहून हजर झाला.

या खुनाची माहिती मिळताच शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील तर गुन्हे अन्वेषण विभागाचे संजय गोरले यानी घटनास्थळी धाव घेवून खुनाची माहिती घेतली. पण, खुनात वापरलेला विळा मात्र मिळून आला नाही. या खुनाची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदार जनजागृतीला गती द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा कोल्हापूर (जिमाका): मतदानासाठी केवळ आठवडा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *