Monday , December 23 2024
Breaking News

कोल्हापुरात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

Spread the love

 

कोल्हापूर : सीमावाद प्रलंबित असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी महाराष्ट्रातील भूभागावर दावा केल्यानंतर रणकंदन सुरु झाले आहे. कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी बसवराज बोम्माई यांचा तीव्र निषेध करत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला असता शिवसैनिकांशी जोरदार झटापट झाली. ही अंत्ययात्रा कोल्हापुरातील दसरा चौक ते जयंती नाला असा काढण्यात येत होती. दरम्यान, हे आंदोलन काही अंतरावर जाताच पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

बोम्मईंच्या उलट्या बोंबा

यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले की, जत, अक्कलकोट व सोलापूरवर बोम्माई दावा करत कर्नाटकचा भाग असल्याचे सांगत आहेत. मात्र, चोराच्या उलट्या बोंबा असतात तशाच बोम्माई यांच्या उलटड्या बोंबा आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा सुरु असताना त्याला छेद देण्याचे काम बोम्मई करत आहेत. कर्नाटकमधून येणाऱ्या बसेस बंद केल्या आहेतहा हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करत आहे.

कर्नाटक बसेसनाही विरोध

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी महाराष्ट्रातील भूभागावर केलेल्या दाव्यानंतर कोल्हापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या या वादानंतर कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील एसटी बससेवा ही बंद केल्याचे वृत्त आहे. यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आज कोल्हापुरात सीबीएस स्थानकातील कर्नाटकच्या बस गाड्यांवर जय महाराष्ट्र लिहित कर्नाटकच्या बस गाड्या महाराष्ट्रात येऊ न देण्याचे आवाहन एसटी प्रशासनाला केले.

About Belgaum Varta

Check Also

महामेळाव्यास परवानगी नाकारली तर कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांना महाराष्ट्र सीमेवर अडवू

Spread the love  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इशारा कोल्हापूर : बेळगाव येथे ९ डिसेंबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *