Wednesday , December 4 2024
Breaking News

आम्ही 19 डिसेंबरला बेळगावला जाणार आहोत, तुमच्यात धमक असेल तर या : हसन मुश्रीफ

Spread the love

 

कोल्हापूर : कर्नाटक आणि कन्नडिगांच्या दंडूकेशाहीविरोधात महाविकास आघाडीकडून आज कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू समाधीस्थळी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनी सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना जाहीर आव्हान दिले. आम्ही 19 डिसेंबरला बेळगावला जाणार आहोत. तुमच्यात धमक असेल, तर यावे असे जाहीर आव्हान त्यांनी दिले आहे. मुश्रीफ यांनी कर्नाटक सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

सीमाप्रश्नी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. हसन मुश्रीफ पुढे म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री दोन तीन आठवडे काहीही कारण नसताना षड्यंत्र रचत आहेत. बोम्मई म्हणतात निकाल आमच्याच बाजूनं लागणार असं बोलत आहेत. जाणूनबुजून महाराष्ट्राला डिवचण्याचा ते प्रयत्न करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमित शाह यांना देखील हा गडी (बोम्मई) घाबरत नाही.

आम्ही 19 तारखेला बेळगावमध्ये जाणार आहोत, तुमच्यात धमक असेल तर तुम्ही देखील असे सांगत मुश्रीफ यांनी हसनशंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिले. शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतर सीमाभागातील परिस्थिती बदलल्याचे ते म्हणाले.

सीमाभागातील बांधवांच्या कायम पाठीशी राहू

दरम्यान, सतेज पाटील यांनीही कर्नाटक सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांवर हल्ला चढवला. यावेळी बोलताना त्यांनी सीमाभागातील जनतेला सोबत असल्याची ग्वाही दिली. ते म्हणाले की, आम्ही कालही आपल्यासोबत होतो, आजही आहे आणि उद्याही तुमच्यासोबत राहू. आमचा संयम सुटला तर हा प्रश्न निकाली लागण्यास वेळ लागणार नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सीमाभागातील बांधवांच्या कायम पाठीशी राहू. महामानवांचा अपमान करण्याचा सपाटा भाजपच्या नेत्यांनी सुरू ठेवल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. संविधान बदलण्याचा हा डाव दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान

Spread the love  करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदान कोल्हापूर (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *