Monday , December 8 2025
Breaking News

कोल्हापुर लोकसभा मतदारसंघ लढवण्याची मनसेकडून जय्यत तयारी

Spread the love

 

गडहिंग्लज : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील चंदगड विधानसभा, राधानगरी विधानसभा, कागल विधानसभा या मतदार संघाच्या बैठका घेवून परिस्थितीचा आढावा बैठक प्रार्थना हॉल गडहिंग्लज येथे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीच्या वेळी मोठ्या संख्येने राधानगरी, कागल, चंदगड येथील पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा मतदार संघाचा सद्यस्थितीचा बारकाईने आढावा घेण्यात आला. या आढाव्यामध्ये लोकसभा, विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत पर्यंतचे पदाधिकारी ते मनसैनिकांची माहिती घेतली व त्यांना मार्गदर्शन केले. निवडणुका ताकतीने लढवण्यासाठी ही बैठक मा. राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार घेण्यात आली. कोल्हापूर लोकसभा मतदार संघ लढण्यासाठी जी प्राथमिक निवडणूक तयारी असते त्याचा संपूर्ण आराखडा तसेच अनेक पदाधिकारी नविन नेमणूका करण्यासाठी मनसे सज्ज आहे. पक्षाचा अजेंडा, ध्येयधोरण तळागाळातील लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आगामी निवडणुकांचा आराखडा तयार केला आहे, त्या आराखड्याप्रमाणे सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी व महाराष्ट्र सैनिकांनी जबाबदारी हाताळण्याचं काम कोल्हापूर लोकसभा जिल्ह्याचे संघटक बाळासाहेब शेडगे यांनी या आराखड्याचे नियोजन दिलेले आहे, या बैठकीस नरेन्द्र तांबोळी कामगार सेना प्रदेश उपअध्यक्ष, सहसंघटक, प्रशांत मते सह संघटक व कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, जिल्हा उपाध्यक्ष श्री. रोहन निर्मल, सुधीर सुपल, विवेक पाटील मनसे जनाधिकारी सेना जिल्हाध्यक्ष युवराज येडूरे, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे, मनसे माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष अभिजीत तापेकर, भुदरगड तालुकाध्यक्ष अशोक पाटील, राधानगरी तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, आजरा तालुकाध्यक्ष अनिल निऊगरे, तालुका उपाध्यक्ष आनंदा घंटे, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष शिवा मठपती, कागल तालुकाध्यक्ष सौरभ पवार, चंदगड तालुकाध्यक्ष राज सुभेदार, वैभव माळवे, केम्प्पणा कोरी, अमित चौगुले, राहुल व्हांजी, डॉ.प्रफुल आठले, ऋषभ आमते, अमित कोरे, शिवतेज विभुते, प्रवीण मनुगडे, सौरभ कांबळे, मारुती केसरकर, रिमा चव्हाण, अनिता कदम, अनिता पाटील, शितल पाटील, सुगंधा अस्वले, पुजा जाधव, ईदूबाई जाधव, राजमती विश्वकर्मा, कुसुम खोत उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  एक महिन्याच्या विशेष जनजागृती मोहिमेसह थेट कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूर : समाजात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *